आ.अमोल मिटकरी वर तुफान हल्लाबोल,गलिच्छ प्रतिक्रिया तर जनता आक्रमक
salim khan 11 September 2025

Akola: मुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस अंजना कृष्णा यांना धमकी दिल्यानंतर निर्माण झालेल्या वादात आमदार अमोल मिटकरी यांनी उडी मारून परिस्थिती आणखी चिघळवली. नेहमीच्या बेफिकीर सवयीप्रमाणे ना मागचा विचार, ना पुढचा विचार – थेट आयपीएस अंजना कृष्णा यांच्या यूपीएससी नियुक्तीलाच आव्हान देत मिटकरी यांनी क्षणाचाही विलंब न करता पत्र लिहून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर शंका घेतली.

त्याहीपेक्षा घृणास्पद म्हणजे, एका महिला अधिकाऱ्याचे खाणे-पिणे उगाळत त्यांनी सार्वजनिक पातळीवर स्तरहीन टीका केली. हा प्रकार लोकशाहीतील केवळ विद्रूप नमुना नव्हे तर संपूर्ण राजकारणाला कलंक लावणारा प्रकार ठरला आहे.

या घृणास्पद भूमिकेमुळे अमोल मिटकरी यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाचा भडका उडाला असून सोशल मीडियावर त्यांच्यावर तुफान हल्लाबोल सुरू आहे. लोक सरळ सरळ गलिच्छ शब्दांत प्रतिक्रिया देत आहेत.

दुसरीकडे अजित पवारांबद्दलही प्रचंड रोष उसळला आहे. धमकी देणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांविरोधात लोकांचा अविश्वास दिवसेंदिवस वाढत चालला असून विद्यमान सरकारची विश्वासार्हता चिरडली जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू करत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल मागवला. त्या अहवालात अंजना कृष्णा यांनी मुरुम माफियांविरोधात घेतलेली कारवाई कायदेशीर, नियमसंगत आणि पूर्णपणे योग्य असल्याचे स्पष्ट झाले.

त्यामुळे अजित पवार आणि मिटकरी यांच्या मनमानी आरोपांची पोलखोल झाली आहे. आता या वादाचे पुढील रूपांतर कोणत्या राजकीय स्फोटात होईल हे पाहणेच बाकी आहे.







