INDIA NEWS

Press

अकोट जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोणशीला समारंभ..मात्र खर्चावरील शंका चर्चेत

salim Khan 16 September 2025

सद्यस्थितीत उभे असलेले अकोट जिल्हा सत्र न्यायालय..

अकोला जिल्ह्यातील अकोट येथे जिल्हा व सत्र न्यायालयाची नवी इमारत उभारली जाणार असून 25 जानेवारी 2025 रोजी भव्य समारंभात कोणशीला पूजन पार पडले. या कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश, विद्यमान आमदार आणि विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.मात्र या समारंभाच्या आयोजनावर झालेल्या खर्चाविषयी वादंग निर्माण झाले आहे. कार्यक्रमासाठी प्रत्यक्षात एक लाख रुपयांपर्यंत खर्च झाल्याचे बोलले जात असतानाच, सुमारे 25 ते 30 लाख रुपयांचा खर्च दाखवण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.अकोट जिल्हा विधिज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. सुरेंद्र पोटे यांनी याबाबत बांधकाम विभागाकडे माहिती मागितली. परंतु विभागाकडून “समारंभाकरिता निधी उपलब्ध नसल्याने कंत्राटदारास अद्याप देयक अदा झालेले नाही” असे उत्तर देण्यात आले.

हे उत्तर समाधानकारक नसल्याने खर्चातील पारदर्शकतेबद्दल शंका अधिकच गडद झाल्या आहेत.न्यायदानाच्या पवित्र मंदिराच्या उभारणीची सुरुवातच भ्रष्टाचाराच्या छायेत होत असल्याची चर्चा जनतेत सुरू असून, अशा प्रकाराला थारा देऊ नये, अशी अपेक्षा नागरिक आणि विधिज्ञ व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish