INDIA NEWS

Press

आम्हाला विकास हवा, दहशत नाही “प्रभाग ७ मध्ये गुंडशाहीचा कहर, मनिष कराळेच्या दहशतीने नागरिक हैराण..

salim khan 6 October 2025

गजानन नगरवासीयांचा संताप; सोशल मीडियावर खुलेआम धमक्या, पोलीस प्रशासन मौनात !

Akot: नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजताच अकोट शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये राजकारणाची जागा दहशतीने घेतली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणारा मनिष रामाभाऊ कराळे हा नेतृत्वाचा मुखवटा लावलेला “क्लब माफिया” असून, मागील दोन दशकांपासून अकोट शहरात भीतीचे साम्राज्य निर्माण करून बसला आहे.

नागरिकांच्या आरोपानुसार, कराळे आणि त्याच्या टोळीने गोरगरीब जनता, लहान व्यवसायिक, आणि प्रामाणिक नागरिकांवर अत्याचार करून दहशत कायम ठेवण्याचा उद्योग सुरू केला आहे. मागील वीस वर्षात शहरातील अनेक कुटुंबांचा उद्ध्वस्त कारभार, बेघर झालेल्या लोकांचे ओरडणे, आणि गुन्हेगारी घटनांची मालिका ; या सगळ्यांमागे मनिष कराळे गटाचे सावट असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.

सोशल मीडियावरच धमक्या निवडणुकीत हरवले तर लाकूड स्मशानात दिसेल!”

या उमेदवाराने सोशल मीडियावरूनच खुल्या धमक्या देत, “माझ्याविरुद्ध कुणीही उभा राहिला, किंवा मला हरवलं, तर त्याचं लाकूड स्मशानात दिसेल!”
अशी निर्लज्ज पोस्ट केल्याचा नागरिकांचा दावा आहे.
या पोस्टमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून, “कायदा व सुव्यवस्थेची खिल्ली उडवणाऱ्या अशा व्यक्तीविरुद्ध प्रशासन का गप्प आहे?” असा सवाल प्रत्येक गल्लीबोळातून उमटतो आहे.

पोलीसही दबावाखाली?”

नागरिकांच्या मते, काही भ्रष्ट पोलीस अधिकारी या गटाच्या प्रभावाखाली वागत असून, गुंडांना संरक्षण दिले जात आहे.
जनतेचा आवाज दाबण्यासाठी खोटे पुरावे तयार करून निर्दोषांना गुंतवण्याचे प्रकार वारंवार घडले आहेत, असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर गजानन नगरवासीयांनी पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, निवडणुकीच्या काळात वातावरण तापू शकते, असा इशाराही दिला आहे.

अवैध धंद्यांना बळ, तरुणांचा नाश”

गेल्या काही वर्षांत प्रभाग क्रमांक ७ मध्ये कोणतीही विकासात्मक कामे झाली नाहीत. त्याऐवजी वरली, जुगार, मटका यांसारख्या अवैध धंद्यांना कराळे गटाकडून प्रोत्साहन मिळाल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
याच मार्गाने बेरोजगार तरुणांना व्यसनांच्या आहारी नेण्यात आले. अनेक तरुणांच्या अंगावर केसेस चढल्या, आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि कराळे मात्र राजकीय नेत्याच्या पोझमध्ये समाजात मिरवतो आहे, असा नागरिकांचा संताप आहे.

प्रशासनाने लगेच दखल घ्यावी – अन्यथा अराजक माजेल”

“मनिष कराळे आणि त्याचे साथीदार निवडणुकीसाठी काहीही करू शकतात. निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही खालच्या पातळीवर जाण्याची तयारी असल्याची कराळे गटातून बोलून दाखवल्या जात आहे त्यामुळे ही निवडणूक हिंसाचाराच्या दलदलीत ओढली जाऊ शकते.”
या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी अशी तक्रार गजानन नगरातील नागरिकांनी पोलीस अधिक्षकांना सादर केली आहे
सोशल मीडियावरच्या धमक्यांचा गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकशाहीचा अपमान – गुंडांना उमेदवारी कशी?”

“अकोट शहराचा विकास खुंटला आहे, कारण गुंड नेते बनले आहेत!”
“निवडणूक म्हणजे सेवा, पण काहींनी ती गुंडगिरीचा व्यवसाय बनवली आहे!”

आम्हाला विकास हवा, दहशत नाही!”
कायद्याच्या वर कुणी नाही, मग मनिष कराळे कोण?”
अशा आक्रमक भावना नागरिकांच्या समोर येत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish