INDIA NEWS

Press

“३० हजारांची लाच घेताना कनिष्ठ अभियंता जाळ्यात; अकोला पंचायत समितीत खळबळ-आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता”

Abhijeet Solanke. 30 April 2026

अकोला : पंचायत समितीच्या बांधकाम विभागात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारी धक्कादायक कारवाई समोर आली असून कनिष्ठ अभियंता जया इंगोले यांना ३० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याने संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात तक्रारदाराकडून काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली आणि सापळा रचण्यात आला.एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अचूक नियोजन करून जया इंगोले यांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर त्यांना पुढील चौकशीसाठी एसीपी कार्यालयात नेण्यात आले असून गुन्हा नोंद करण्यासाठी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.या घटनेमुळे पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, ही केवळ एका अधिकाऱ्याची कारवाई नसून यामागे मोठे जाळे कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “लहान मासा जाळ्यात सापडला, पण मोठे मासे अजूनही बाहेर आहेत का?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सखोल चौकशी झाल्यास या प्रकरणात अनेक वरिष्ठ अधिकारी आणि दलालांच्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एसीबीने या कारवाईवरच न थांबता संपूर्ण विभागाचा तपास करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे अकोल्यातील शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला असून सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता या कारवाईनंतर पुढे कोणते मोठे नाव समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish