INDIA NEWS

Press

कार्ला बु.मध्ये भीमजयंतीचा अभूतपूर्व जल्लोष; मान्यवरांच्या उपस्थितीत प्रबोधन, एकात्मता आणि प्रेरणेचा संगम..

Ankush jathe, Nanded, 30 April 2026

नांदेड : कार्ला बु., ता. बिलोली – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती कार्ला बु. येथे सामाजिक सलोखा, बंधुता आणि प्रबोधनाच्या तेजस्वी वातावरणात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील सर्व जाती-धर्मातील नागरिकांच्या भव्य उपस्थितीने हा सोहळा ऐतिहासिक ठरला.कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण – शिल्या शिवराज खेळगे (सरपंच) यांच्या हस्ते उत्साहात पार पडली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शंकर महाजन – वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष, धम्मदिप गांवडे – वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष, राजेंद्र पाटील – माजी सरपंच, हाणमंतराव मिनके – ग्रा.पं. सदस्य, मारोती पा. गुनेपवार – चेअरमन सो.सो., शिवराज बरबडे सर, शंकर पा. मोठे मुकुंद – मा. उपसरपंच, गजानन पा. जामनोर – पो.पा. प्रतिनिधी, मारोती कांबळे – ग्रा.पं. सदस्य, रमेश सिरगिरे – सामाजिक कार्यकर्ते, चांदपाशा पिंजारी – मा. शालेय शिक्षण समिती अध्यक्ष, रजाक शेख – सामाजिक कार्यकर्ते, पिराजी बोराळे यांच्यासह सर्व जाती-धर्मातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी आपल्या प्रभावी मनोगतातून डॉ. आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा आणि भारतीय संविधानातील त्यांच्या अमूल्य योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा प्रेरणादायी संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची जिद्द आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव जागवली.

यावेळी लहान बालकाचे सभा भाषण उपस्थितांचे लक्ष वेधून घेत विशेष दाद मिळवून गेले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भीमगीतांनी वातावरण भारावून गेले, तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रभावी व सुटसुटीत सूत्रसंचालन गंगाधर काबरें यांनी केले. शिक्षक, पालक, ग्रामस्थ व आंबेडकरी अनुयायी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा केवळ उत्सव न राहता सामाजिक जागृतीचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला. कार्ला बु.मध्ये साजरा झालेला हा भीमजयंती उत्सव एकात्मता, विचारप्रबोधन आणि नव्या पिढीला दिशा देणारा अविस्मरणीय सोहळा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish