hacklink al hack forum organik hit kayseri escort jojobet 1019deneme bonusu verendeneme bonusu veren sitelermarsbahis 463deneme bonusu veren sitelersahabetdeneme bonusu veren sitelerviagra onlinebonus albaşiskele escortbahis1000Mostbetbahis ve casino oyunları1windeneme bonusu veren sitelercasbommatadorbetcasibom girişonwin girişpusulabetgüvenilir bahis siteleri slot oyunları deneme bonusu veren bahis sitelericashback bahis girişcashback bahis girişonwin

INDIA NEWS

Press

Monsoon Update: सावधान! पुढील चार दिवस पावसाचेच…! ‘या’ ठिकाणी कोसळणार अति-मुसळधार…

August 18, 2022

India news press

Monsoon Update: मित्रांनो सध्या देशात पावसाळ्याच्या (Monsoon) दुसऱ्या टप्प्यात अनेक ठिकाणी पावसामुळे (Monsoon News) पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचवेळी, यंदा मान्सूनच्या पावसाबाबत (Rain) फारच अप्रत्याशित वृत्ती निर्माण झाली आहे.

म्हणजे अनेक राज्यांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, तर अनेक भागात कमी पाऊस किंवा नुसत्या रिमझिम पावसामुळे त्या ठिकाणचे शेतकरी वरूनराजावर नाराज झाले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (IMD) 21 ऑगस्टपर्यंत देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अंदाजानुसार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य महाराष्ट्र आणि ओडिशामधील काही भागांवर वाईट परिणाम होऊ शकतो.

या राज्यांमध्ये वरूनराजा कोपणार !

18 ऑगस्टला सौराष्ट्र आणि कच्छमध्ये आणि 20 आणि 21 ऑगस्टला कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याच वेळी, उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावाखाली 19 ऑगस्टच्या सुमारास हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, 21 ऑगस्टपर्यंत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भासह, गंगेच्या पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंडमध्ये पाऊस पडू शकतो.

छत्तीसगडमध्ये 21 ऑगस्टपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आणि अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 21 ऑगस्ट रोजी बिहार, पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस पडू शकतो. 22 ऑगस्टपर्यंत ओडिशात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, जर आपण राष्ट्रीय राजधानी दिल्लीबद्दल बोललो, तर वीकेंडमध्ये थोडा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार

भारतीय हवामान विभागाच्या मते (Maharashtra Weather Update), आज विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे मात्र तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस बरसणार असल्याचे संकेत देखील हवामान विभागाने दिले आहेत.

निश्चितच राज्यात विदर्भ वगळता सर्वत्र श्रावण सरी बरसणार आहेत. भारतीय हवामान विभागाच्या मते आज 18 ऑगस्ट रोजी विदर्भातील बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाने या संबंधित जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish