मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक झटका – भ्रष्ट अधिकारी व न्यायाधीशांना आता थेट बडतर्फीचा फटका!
Raviraj 7 September 2025

Mumbai: High court
श्रीमंत व प्रभावशाली लोकांच्या दबावाखाली काम करणाऱ्या तहसीलदार, जिल्हाधिकारी, मंत्री आणि अगदी न्यायाधीशांनाही आता कायद्याच्या चौकटीबाहेर पाऊल टाकल्यास थेट बडतर्फी आणि तुरुंगवास टाळता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाने भ्रष्ट प्रवृत्तीला जोरदार धक्का बसला असून, “कोणीही कायद्यापेक्षा वर नाही” हा निर्विवाद संदेश संपूर्ण न्यायव्यवस्थेला मिळाला आहे.

न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी Harish Arora v. Registrar of Coop. Societies, 2025 SCC OnLine Bom 2833 या प्रकरणात दिलेल्या निर्णयात स्पष्ट शब्दांत ठरवले की, कायद्याच्या चौकटीबाहेर दिलेला आदेश हा केवळ चुकीचा नाही तर तो न्यायिक बेइमानी (Legal Malice) आहे. अशा आदेशांचे लेखक असलेले अधिकारी वा न्यायाधीश हे स्वतःच गुन्हेगार ठरतात आणि त्यांच्यावर विभागीय चौकशी, निलंबन, बडतर्फी तसेच फौजदारी कारवाई अनिवार्य ठरते.

गेल्या अनेक दशकांपासून भ्रष्ट अधिकारी आणि न्यायाधीशांनी श्रीमंत व दलालांच्या दबावाखाली आदेश पारित करून सामान्य जनतेचे हक्क पायदळी तुडवले. त्यांना झाकण्यासाठी तथाकथित वरिष्ठ वकिलांनी “न्यायाधीशांवर कारवाई होऊ शकत नाही” असा खोटा प्रचार करून न्यायालयीन व्यवस्थेला कलंक लावला. बॉम्बे बार असोसिएशनने तर भ्रष्ट न्यायाधीशांचे रक्षण करण्यासाठी बोगस ठराव पारित करून सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवले, मात्र सर्वोच्च न्यायालयाने दोन वेळा त्यांना फेटाळून लावले. तरीही दलाल वकिलांनी आपली गुलामगिरीची मानसिकता सोडली नाही.
आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या भ्रष्ट लॉबीचा मुखवटा फाडला गेला असून, बॉम्बे बार असोसिएशनसह दलाल वकिलांचे पितळ उघडे पडले आहे. भ्रष्ट प्रवृत्तीला संरक्षण देणाऱ्यांची प्रचंड नाचक्की झाली आहे आणि त्यांच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

इंडियन बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. निलेश ओझा, ॲड. विजय कुरले आणि त्यांचे सहकारी यांनी गेली दोन दशके भ्रष्ट प्रवृत्तीविरुद्ध निर्भीड लढा दिला. या निर्णयाने त्यांच्या संघर्षाला शिक्कामोर्तब झाले असून, सामान्य नागरिक व होतकरू वकिलांना एक मोठे शस्त्र मिळाले आहे. आता दबाव, धमक्या आणि खोट्या दाव्यांच्या पलीकडे जाऊन न्याय मिळविण्याचा आत्मविश्वास प्रबळ झाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे भ्रष्ट अधिकारी, मंत्री व न्यायाधीशांसाठी शेवटचा इशारा आहे. मनमानी केली, आदेश विकले, भ्रष्टाचार झाकला – तर खुर्ची गमावावीच लागेल आणि तुरुंगात जावे लागेल.







