औद्योगिक वसाहतीत नकली नोटांचे जाळे? ट्रकचालक-मजुरांना टार्गेट केल्याची चर्चा
salim Khan 4 March 2026

अकोट: हिवरखेड रोड परिसर हा अकोटमधील सर्वात गजबजलेला औद्योगिक पट्टा मानला जातो. डाळ मिल, जिनिंग, तसेच इतर कंपन्या या भागात कार्यरत असल्याने येथे दिवसभर ट्रकचालक, हमाल, मजूर आणि कामगारांची मोठी वर्दळ असते. या गर्दीचा गैरफायदा घेत काही संशयित राजेश साळुंखे सह हापिस भागीदार असलेल्या पॉईंटवरून नकली नोटा चलनात आणल्या जात असल्याची चर्चा जोर धरत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, व्यवहारानंतर मिळालेल्या काही नोटा बँकेत जमा करताना बनावट असल्याचे निदर्शनास आले. कामगार व ट्रकचालक वर्ग हा दिवसभराच्या कष्टानंतर मिळालेल्या पैशावर अवलंबून असतो अशा वेळी नकली नोट हातात पडल्यास त्यांचे दुहेरी नुकसान होते. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. भीती पोटी वरली बहादरांकडून चुप्पी साधल्या जाते सराईत गुंड प्रवृत्ती विकी उर्फ सुमित वानखडे क्लब माफिया मनिष कराळे राजेश साळुंखे यांने पाळून ठेवल्यामुळे कुणीही समोर येण्यास हिंम्मत करीत नाही या गुंडांच्या दहशतीमुळे कुणीच नकली नोट परत देण्यासाठी सुद्धा राजेश साळुंखे कडे माघारी फिरत नाही मात्र आता फसवणूक झालेले अनेक वरली बहाद्दर समोर येऊन हिवरखेड रोडवरील राजेश साळुंखेच्या वरलीच्या पॉईंटवरून नकली नोटा मिळत असल्याची पुष्टी केली जात आहे व राजेश साळुंखे याचे व्हाट्सअप कॉल डिटेल्स काढल्यास स्थानिक पोलीस व अकोला एलसीबी मधील अनेक कर्मचाऱ्यांसोबत अर्थपूर्ण व घनिष्ठ संबंध असल्याचे खात्री पूर्ण सांगितल्या जात आहे

‘ आठवड्याला हिशेब’ कुठे होतो?
या संशयित व्यवहारांचा आठवड्याला नियमित संपूर्ण लेखाजोखा शहरातील शौकत अली चौक नजीक जुन्या तहसीलच्या खालच्या बाजूला राजेश साळुंखे च्या भागीदाराच्या फ्लॅट मध्ये केला जातो ही सर्व गोपनीय माहिती स्थानिक पोलीस आणि उच्चस्तरीय (lCB) यंत्रणांना असल्याचीही चर्चा काही जण करीत आहेत. मात्र लाखो रुपयांचे हप्ते पोहोचत असल्यामुळे स्थानिक आणि जिल्हा पोलीस यंत्रणा हतबल झाल्याचे दिसून येते
कर्तव्य निष्ठेला जपणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची हतबलता

त्यामुळे बोटावर मोजण्यासारखे असलेले इमानदार व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सुद्धा या सर्व प्रकारामुळे संशयाने बघितले जाते आयुष्यभर पगारामध्ये समाधानी मानत निष्ठेने कर्तव्य करीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना हा गंभीर प्रकार उघड्या व हतबल डोळ्यांनी बघावा लागत आहे अशा भावना व्यक्त होत आहेत







