“पत्रकाराला संपवण्याचा कट की पोलीस-राजकीय संगनमत?” तडीपार, खोटे गुन्हे आणि ‘जेलमधील मर्डर प्लॅन’च्या चर्चेने अकोट पेटले!
Abhijit solanke 29 march 2026

अकोट : अकोट शहरात सध्या एकच प्रश्न प्रत्येकाच्या ओठावर आहे—काय खरंच एका निर्भीड पत्रकाराला कायमचं गप्प करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे का? की ही केवळ अफवा आहे? पण जर ही अफवा असेल, तर ती एवढ्या आत्मविश्वासाने आणि उघडपणे पसरवली कशी जाते? आणि जर यात तथ्य असेल, तर अकोटमध्ये कायद्याचा आणि लोकशाहीचा अंत जवळ आला आहे का? पत्रकार रविराज मोरे यांनी वरली व्यवसायाच्या आडून सुरू असलेल्या कथित अवैध व्यवहारांवर आवाज उठवल्यानंतरच त्यांच्याविरोधात तडीपार, खोटे गुन्हे आणि अगदी जेलमध्येच संपवण्याचा कट रचला जात असल्याच्या चर्चांनी भीषण वळण घेतले आहे. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींचा उगम कुख्यात वरली बहाद्दर व बनावट नोटा चलनात आणणारा देशद्रोहासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला राजेश रमेश साळुंखे याच्याकडून होत आहे तरीही त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, हा सर्वात मोठा संशयाचा मुद्दा ठरत आहे.या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे—पोलीस प्रशासनातील काही घटकांवर थेट बोट ठेवले जात आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या कार्यालयातील कथित गोपनीय माहिती राजेश साळुंखे पर्यंत बाहेर कशी जाते? कोण लीक करतो? आणि कोणाच्या सांगण्यावरून? हा प्रश्न आता केवळ चर्चेपुरता मर्यादित न राहता जनतेच्या संतापाचा केंद्रबिंदू बनला आहे.जर एखाद्या व्यक्तीकडे आधीच पोलीस हालचालींची माहिती पोहोचत असेल, तर याचा अर्थ काय घ्यायचा?👉 पोलीस यंत्रणेतील गळती?👉 आर्थिक व्यवहारांचा खेळ?👉 की थेट ब्लॅकमेलिंग आणि संगनमत?या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नसल्यामुळेच संशय अधिक गडद होत चालला आहे.याहून गंभीर बाब म्हणजे—हक्कभंग प्रस्तावाच्या आडून कारवाई करण्याचा कथित प्लॅन. आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या नावाशी जोडल्या जाणाऱ्या या प्रक्रियेचा वापर जर एका पत्रकाराविरोधात ‘हत्यार’ म्हणून होत असेल, तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा नाही का?दरम्यान, शहरातील पत्रकार बांधवांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. “अवैध धंदे उघड करणाऱ्यांनाच संपवायचं?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. जर सत्य मांडणाऱ्यालाच गुन्हेगार ठरवलं जात असेल, तर उद्या कोणताही नागरिक सुरक्षित राहणार का?

वरिष्ठ पत्रकार प्रभाकर बोरकर यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना स्पष्ट इशारा दिला आहे की, “जर अशा प्रकारे निर्भीड पत्रकारांना लक्ष्य केलं जात असेल, तर हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट हल्ला आहे आणि आम्ही हे सहन करणार नाही.”समाजसेवक पांडुरंग खवले यांनीही प्रशासनाला थेट प्रश्न विचारला आहे—“जर दबंग पत्रकारांनाच संपवण्याचे कट रचले जात असतील, तर मग सामान्य माणसाने न्याय कुणाकडून मागायचा?”या सर्व पार्श्वभूमीवर आता परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. लोकांच्या मनात एकच भीती घर करू लागली आहे—👉 काय अकोटमध्ये कायदा खरोखरच जिवंत आहे का?👉 की सर्व काही ‘सेटिंग’वर चालतंय?👉 आणि सर्वात महत्त्वाचं—जर आज रविराज मोरे सारखे पत्रकार सुरक्षित नाही, तर उद्या सामान्य नागरिकाचं काय?आता गरज आहे ती केवळ चौकशीची नाही, तर कठोर, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशीची.राजेश साळुंखे यांचे कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार, पोलीस अधिकाऱ्यांशी असलेले संबंध—सगळं उघड झालं पाहिजे.नाहीतर…ही घटना केवळ एक बातमी राहणार नाही—तर “पोलीस प्रशासनच संशयाच्या कटघऱ्यात उभं राहिलं” असा काळा अध्याय लिहिला जाईल!







